पोलिस बंदोबस्तात मिळणार शिवभोजन; गोंधळ होऊ नये म्हणून खबरदारी

टीम महाराष्ट्र देशा : राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजना २६ जानेवारीपासून प्रायोगिक तत्वावर लागू होणार आहे. राज्यातील गरीब नागरिकांसाठी ही योजना असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. परंतु, असे असले तरी प्रत्यक्षात या योजनेचे लाभार्थी कोण, हेच अद्याप ठरविले गेले नाही. यामुळे शिवभोजन केंद्रांवर गर्दी झाल्यास गोंधळ होण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेता शिवभोजन केंद्रांवर पोलिस बंदोबस्त ठेवावा, असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना शासनाने दिले असल्याची माहिती आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिवभोजन थाळीचा कोटा ठरवून दिला असल्याने जो प्रथम येईल, त्यालाच लाभ मिळेल, असे सध्याचे स्वरूप आहे. त्यातूनच केंद्रांवर गोंधळ व गर्दी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊनच अन्न व नागरी पुरवठा विभागाने प्रत्येक केंद्रासाठी पोलिस कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश दिले.

Loading...

राज्याचा कोटा १८ हजार थाळींचा आहे. तर प्रत्येक जिल्ह्यासाठी या योजनेचा कोटा ठरवण्यात आहे. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांसाठी राबवण्यात येणार असली तरी त्यासाठी लाभार्थी कोण असणार हे स्पष्ट नाही. या योजनेसाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने अनेकवेळा व्हिडिओ कॉन्फरन्स घेतल्या.

मात्र त्यात लाभार्थी कोण हे स्पष्ट केलेले नाही. यामुळे जो केंद्रावर प्रथम येईल, त्यालाच शिवभोजन मिळेल. भोजनाची वेळ दुपारी बारा ते दोन आहे परंतु त्याच्या आधीच जर निर्धारित कोटा संपला तर लाभार्थींना वंचित राहावं लागणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'