#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी ‘शिवभोजन’ घेऊ नये : अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा : महाविकास आघाडी सरकारच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेचं प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात उद्घाटन करण्यात आले. तसेच अजिप पवार यांनी पुण्यामध्ये आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईत या योजनेचे उद्घाटन केले.

तसेच यावेळी अजित पवार यांनी आज पहिली थाळी लाभार्थीला देण्यात आली. या थाळीमध्ये भात, डाळ, भाजी, लोणचे, दोन चपात्या होत्या. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘ज्यांची ऐपत असेल त्यांनी या योजनेचा लाभ घेऊ नये असे, आवाहन अजित पवार यांनी यावेळी बोलताना केले.

Loading...

याच प्रमाणे शहरात आणि ग्रामीण भागात या ‘शिवभोजन’ थाळीचे दर वेगवेगळे आहेत. शहरीपेक्षा ग्रामीण भागात 15 रुपये कमी ठेवण्यात आले आहेत. गरीबांना पोटभर जेवण मिळावे हा यामागचा उद्देश आहे. 150 थाळ्या देण्यात येणार आहेत. यामुळे ज्यांची पूर्ण पैसे देऊन जेवण घ्यायची ऐपत आहे अशांनी या योजनेचा लाभ घेऊ नये असे आवाहन केला आहे.

दरम्यान, पहिल्या टप्प्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात शिवभोजन सुरू होणार आहे. या दोन्ही ठिकाणी दररोज सुमारे 1500 नागरिक या योजनेचा लाभ दुपारी 11 ते 2 या वेळात घेऊ शकणार आहेत. या भोजनालयात एकावेळी किमान 25 लोक बसू शकतील एवढी आसनव्यवस्था उपलब्ध असणे आवश्यक आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण