#शिवभोजन : पोटाला जात, पात, धर्म आणि आर्थिक स्थितीचे निकष लावू नये – आदित्य ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : महाविकास आघाडी सरकारच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेचं प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यामध्ये व पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई येथे या योजनेचे उद्घाटन केले.

पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई उपनगर महसूल कर्मचारी उपहारगृहात ही 10 रुपयांत थाळीची योजना सुरू करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी पोटाला जात, धर्म आणि आर्थिक स्थितीचे निकष न लावता सर्वांना स्वस्त आणि दर्जेदार आहार मिळावा हेच या योजनेचे उद्दिष्ट असल्याचे म्हटले आहे.

तसेच अजित पवार यांनी आज पहिली थाळी लाभार्थीला देण्यात आली. या थाळीमध्ये भात, डाळ, भाजी, लोणचे, दोन चपात्या होत्या. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘ज्यांची ऐपत असेल त्यांनी या योजनेचा लाभ घेऊ नये असे, आवाहन अजित पवार यांनी यावेळी बोलताना केले.

याच प्रमाणे शहरात आणि ग्रामीण भागात या ‘शिवभोजन’ थाळीचे दर वेगवेगळे आहेत. शहरीपेक्षा ग्रामीण भागात 15 रुपये कमी ठेवण्यात आले आहेत. गरीबांना पोटभर जेवण मिळावे हा यामागचा उद्देश आहे. 150 थाळ्या देण्यात येणार आहेत. यामुळे ज्यांची पूर्ण पैसे देऊन जेवण घ्यायची ऐपत आहे अशांनी या योजनेचा लाभ घेऊ नये असे आवाहन केला आहे.

दरम्यान, पहिल्या टप्प्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात शिवभोजन सुरू होणार आहे. या दोन्ही ठिकाणी दररोज सुमारे 1500 नागरिक या योजनेचा लाभ दुपारी 11 ते 2 या वेळात घेऊ शकणार आहेत. या भोजनालयात एकावेळी किमान 25 लोक बसू शकतील एवढी आसनव्यवस्था उपलब्ध असणे आवश्यक आहे.