मुंबई : मागील काही दिवसांपासून राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नावाची तुफान चर्चा झाली. शिवसेनेतील आमदारांच्या बंडखोरी पासून ते राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपर्यंत संजय राऊत यांच्या नावाचाच बोलबाला सुरू होता. दरम्यान राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून संजय राऊत यांनी आणखी आक्रमकतेने सरकारवर टीका करणे सुरू केले आहे. तसेच हे सरकार अंतर्गत मतभेदांमुळे कोसळणार असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
“आम्ही भाजप सारख्या पिपाण्या वाजवणार नाहीत. हे सरकार कधी पडणार याच्याही तारखा देणार नाहीत. त्यांना जे काही पिपाण्या, सनई, चौघडे वाजवायचेत ते वाजू द्यात. मात्र हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही. अंतर्गत कलहाने हे सरकार लवकरच कोसळेल असाही दावा संजय राऊत यांनी केला आहे. दोघेच जण मिळवून सरकार चालवत आहेत. सध्या राज्यात हम दोनो एक दुजे के लिये असच चाललंय, असा टोलाही संजय राऊत यांनी सरकारला लगावला आहे.
यावेळी बोलताना त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा ही उल्लेख केला आहे. मी चंद्रकांत पाटलांचे आभार मानतो, त्यांनी मनातील मळमळ बोलवून दाखवली. अशा शब्दात राऊत यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा उल्लेख केला आहे. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी एका ठिकाणी बोलताना, आम्ही एकनाथ शिंदे यांना मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केले असल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय मैदानात चांगलीच चर्चा रंगली होती. यावेळी बोलताना राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही डिवचले आहे. मी आज एक व्हिडिओ ट्विट केला आहे ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस बोलतं आहेत. माणूस किती खोटं बोलू शकतो हे उघड करणारा तो व्हीडिओ आहे. असेही संजय राऊत म्हणाले.
Ohhh… loud speaker!
ठीक ढंग से बोले गए
झूठ को ही आज कल
सत्य कहते है…
जय महाराष्ट्र!@AUThackeray@BJP4Maharashtra pic.twitter.com/NGLRSwBro8— Sanjay Raut (@rautsanjay61) July 24, 2022
महत्वाच्या बातम्या :
- Neeraj Chopra : नीरज चोप्राने पुन्हा एकदा रचला इतिहास; जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये रौप्य पदक!
- Shiv Sena : सुरत, गुवाहाटी आणि गोव्याला गेल्यामुळे गुलाबराव पाटलांना स्मृतिभ्रंश झालाय; शिवसेनेचा पलटवार
- Raj Thackeray : शिंदे गटाने मनसे पक्षात विलीन व्हायचा प्रस्ताव दिला तर आम्ही विचार करु – राज ठाकरे
- Raj Thackeray : पवारांनी सांगितलं म्हणून मी माझा पक्ष काढेल का? राज ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
- Shinde Government : हे सरकार शेतकऱ्यांसाठी अपयशी ठरतय का? २४ दिवसांत ८९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<