शीतली परत आली रे ! एका हटके भूमिकेत

टीम महाराष्ट्र देशा : ‘लागिरं झालं जी’ या मालिकेने महिन्याभरापूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेतल्या अज्या आणि शीतलीची अनोखी प्रेम कहाणी सगळ्यांनाच भावली. तसंच या दोन्हीही व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरल्या. मालिका जरी संपली असली तरी देखील या व्यक्तिरेखांचा उल्लेख मात्र प्रेक्षक आवर्जून करतात. जर रसिक-प्रेक्षक त्यांच्या लाडक्या शीतलीला मिस करत असतील तर त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. शीतल अर्थात अभिनेत्री शिवानी बावकर पुन्हा एकदा एका नव्या मालिकेत दिसणार आहे.

झी मराठीवरील आगामी आलटी पालटी या मालिकेत शिवानी मुख्य भूमिकेत चमकणार असून यात ती एक ठग म्हणून दिसेल. मालिका आणि मालिकेतील इतर कलाकारांबद्दलची माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. लवकरच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.