शिवमच्या आक्रमक फलंदाजीने पोलार्डला भरली धडकी, षटकात फेकले 3 वाईड बॉल

टीम महाराष्ट्र देशा : वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या टी -20 सामन्यात भारताचा नवखा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे चांगलाचं गाजला. कर्णधार विराट कोहलीने केलेल्या नवीन प्रयोगाचा चांगलाचं परिणाम मैदानावर पाहायला मिळाला. विराट कोहलीने शिवम दुबेला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले. या संधीचा फायदा उचलत शिवमने 30 चेंडूत 54 धावा ठोकल्या. तर वेस्ट इंडिजचा अनुभवी खेळाडू आणि कर्णधार केरॉन पोलार्डलाही चांगलेचं कुटले. त्यामुळे पोलार्डच्या मनात शिवम विषयी चांगलीचं धडकी भरली असल्याचे म्हंटले जात आहे.

केरॉन पोलार्ड भारताच्या डावाच्या 9 व्या षटकात गोलंदाजीला आला. या षटकात पोलार्डला 26 धावा ठोकल्या. या षटकात पोलार्डने 3 वाईड बॉल टाकले तर सलग तीन षटकारही खाल्ले. या भारतीय फलंदाजाने अशाप्रकारे आपल्या ज्वलंत फलंदाजीने सर्वांना चकित केले. त्यामुळे केरॉन पोलार्डने शेवटी शिवमला गोलंदाजी करताना बॉल फेकले असल्याचे म्हंटले जात आहे.

दरम्यान भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या सामन्यात पाहुण्यांनी दणदणीत विजय मिळवून तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 170 धावा केल्या. टीम इंडियाच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा उचलताना विंडीजनं हा सामना 8 विकेट्सनं जिंकला.

महत्वाच्या बातम्या