‘काश्मिरात पर्यटन, आर्थिक गुंतवणूक, व्यवसाय व रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील’

blank

टीम महाराष्ट्र देशा : जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारकडून घेण्यात आला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० हटवण्याची शिफारस राज्यसभेत केली, शहा यांनी सभागृहात संसोधन विधेयक मांडताच कॉंग्रेससह इतर विरोधकांनी थयथयाट केला. सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयामुळे देशभरात आनंद व्यक्त केला जात आहे.

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील आपली भावना व्यक्त केली आहे. भारतीय इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक व सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस म्हणून ओळखला जाईल. कलम ३७० रद्द करण्यात आल्याने खऱ्या अर्थाने जम्मू आणि काश्मिर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे प्रकर्षाने अधोरेखित झाले आहे. या निर्णयाचे देशाच्या सर्वांगीण प्रगतीवर सकारात्मक दूरगामी परिणाम तर होतीलच शिवाय जम्मू आणि काश्मिर मधील सामाजिक शांतता निर्माण करण्यात हा निर्णय एक मैलाचा दगड ठरेल असं पाटील यांनी म्हटलं आहे.

शिवसेना-भाजपा युती शासनाच्या विकासात्मक विचारसरणीच्या सरकार मुळेच हा निर्णय प्रत्यक्षात अमलात येत आहे. पर्यटन, आर्थिक गुंतवणूक, व्यवसाय व रोजगाराच्या नवीन संधी अशा सर्वांगाणे जम्मू व काश्मीर आता देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाला खुला झाला असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

खासदार संभाजीराजे यांनी देशाला एकत्र करणारा आजचा निर्णय छत्रपती शिवरायांना सुद्धा आवडला असणार अस म्हणत या निर्णयाला पाठींबा दिला आहे.देशाला एकत्र करणारा निर्णय छत्रपती शिवरायांना सुद्धा आवडला असणार. प्रत्येक भारतीयांचे स्वप्न आज पूर्ण झाले ! खऱ्या अर्थाने काश्मीर भारताचे अविभाज्य अंग बनले. या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार मला ही होता आलं, हे मी माझं भाग्य समजतो. काश्मिरी जनतेला मुख्यप्रवाहात आणणऱ्या निर्णयासोबत आपण सर्वजण उभे राहिले पाहिजे. येणाऱ्या पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एक होणं आवश्यक आहे. मी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि सरकारचे अभिनंदन करतो. असे उद्गार खासदार संभाजीराजे यांनी काढले आहेत.

कलम ३७० हटवण्याला केजरीवालांचा सरकारला पाठींबा

घटनेतील ३७० कलम हटवण्याच्या मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाचे हे आहेत फायदे

राज्यात उभारणार 8 लाख घरे- मुख्यमंत्री