शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा लढाऊबाणा, वयाच्या ९१व्या वर्षी कोरोनाला हरवलं

shivajirao patil nilangekar

लातूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांना करोनाची लागण झाली होती. ते लातूरमध्येच उपचार घेत होते. मात्र आता निलंगेकर यांनी वयाच्या ९१व्या वर्षी कोरोनावर मात केली आहे.

१४ जुलैला शिवाजीरावांना ताप आणि सर्दीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर निलंग्यातील डॉक्टरांशी चर्चा करून त्यांना लातूरला हलवण्यात आलं. तिथं त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र, तिथं त्यांची करोना चाचणी करून घेण्यात आली होती. त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. मात्र शिवाजीराव पाटील निलंगेकरांच्या लढाऊबाण्याचे आता कौतुक होत आहे. दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी फेसबुक पोस्ट करत शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती दिली आहे.

मराठी माणसाला लिव्ह-इन रिलेशन काय असतं हे माहितीच नाही, थोरातांचा फडणवीसांना टोला

‘शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब कोरोना आजाराचा त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, त्यांनी त्यांच्या संघर्षाच्या नेतृत्व गुणातुन ,वयाच्या 91 व्या वर्षी कोरोना आजारावर मात केली असून, त्यांची प्रकृती चांगले असून सुधारणा होत आहे, या काळात त्यांच्या तब्येतीबद्दल माननीय प्रियंका गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री, लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी विचारपूस व सहकार्य केले तसेच कार्यकर्ते ,निलंगेकर परिवारावर सतत प्रेम करणारे यांनी दादा साहेबांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी देवाला अभिषेक करणे, प्रार्थना करणे ,साकडे घालने, या त्यांच्या आपुलकीने आशीर्वादाने दादासाहेब कोरोना आजारातुन बरे झाले ,या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो निलंगेकर परिवारावर ,असेच प्रेम अशीच आपुलकी ,भविष्यातही राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो’. अशी फेसबुक पोस्ट अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली आहे.

‘हे कशावर आणि कशाच्या आधारे भविष्यवाणी करतात हेच मला समजलेलं नाही’, थोरातांचा जोरदार टोला

IMP