‘कोल्हेंना निवडून दिल्याचा लोकांना पश्चाताप होतोय’  

टीम महाराष्ट्र देशा : डॉ.कोल्हें शिवस्वराज्य यात्रेनिमित्त महाराष्ट्रात विविध मतदारसंघात फिरतायत. लोकांमध्ये माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत. ते जिथे जातील तिथे लोक त्यांचा पक्ष सोडून जात आहेत. त्यांची शिवस्वराज्य यात्रा संपली की, त्यांचा पक्षही संपेल अशी टीका शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी डॉ.अमोल कोल्हेंनवर केली आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरुर मतदारसंघातून अमोल कोल्हें यांनी शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. लोकसभेला झालेला पराभव हा अपघात होता अस आढळराव पाटील यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या नावानं भावनेचं व जातीच राजकारण केलं. डॉ.अमोल कोल्हेंना निवडून देऊन लोकांना आता पश्चाताप झालाय असा आरोप त्यांनी डॉ.कोल्हेंनवर केला.

लोकसभेत सुद्धा ३७ पैकी १९ दिवस ते गैरहजर होते. मतदारसंखासाठी देखील फिरताना दिसत नाहीत. ते आता भोसरी आणि हडपसर मध्ये देखील फिरकताना दिसत नाहीत असा दावाही त्यांनी केला. दरम्यान जो नेता जनतेला त्यांचा फ्री वेळ देऊ शकत नाही, तो नेता काय कामाचा असा प्रश्न त्यांनी उपस्थित लोकांना विचारला.

महत्वाच्या बातम्या