fbpx

पराभव विसरून आढळराव-पाटील लागले कामाला , मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मोठी मागणी

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदार संघात धक्कादायक पराभव स्वीकारल्यानंतर शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव-पाटील तो पराभव विसरून पुन्हा एकदा जोमाने मतदारसंघाच्या कामाला लाले आहेत. राष्ट्रीय कृषी उच्चाधिकारी समितीने रसायनमुक्‍त शेतमाल उत्पादन आणि निर्यातीसाठी जुन्नर किंवा भीमाशंकर येथे विशेष क्‍लस्टर उभारण्याची शिफारस निती आयोगाला करावी, अशी मागणी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि शिवसेनेचे उपनेते यांनी उच्चाधिकार समितीचे निमंत्रक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर या शेतीप्रधान तालुक्‍यांचा समावेश आहे. हा प्रदेश निसर्ग आणि शेती समृद्ध असून, शेतकरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातुन निर्यातक्षम फळे भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहे. या प्रदेशातील बहुतांश भाजीपाला हा मुंबईसह देशाच्या विविध भागात पाठविला जात आहे. निती आयोगाने सुचविल्याप्रमाणे शेतीमध्ये खासगी आणि परकीय गुंतवणुक वाढीसाठी शेती क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देणे गरजेचे आहे.

यासाठी जुन्नर किंवा भीमाशंकर परिसरात तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथील फ्लोरिकल्चर पार्कच्या धर्तीवर रसायनमुक्‍त भाजीपाला उत्पादन आणि “निर्यात पार्क’ उभारण्याची नितांत गरज आहे. शेतीतील वाढत्या रसायनांच्या वापरामुळे मानवी आरोग्यावर विपरित परिणाम दिसु लागले आहेत. यामुळे देशांर्गत आणि परदेशातून रसायनमुक्‍त भाजीपाल्याची मागणी वाढत आहे. बाजारपेठेचीही गरज आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी रसायनमुक्‍त भाजीपाला उत्पादन आणि “निर्यात पार्क’ उभारण्याची नितांत गरज आहे. तरी या मागणीचा सकारात्मक विचार करुन तशी शिफारस आपण आपल्या समिती अहवालात करावी असे नमूद करण्यात आले आहे.