शिवाजीनगर शासकीय गोदामाची जागा मेट्रोला प्राप्त

जागेचा आगाऊ ताबा मिळाल्याने प्रकल्पाला आणखी वेग येण्यास मदत

पुणे – पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात होत असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या शिवाजीनगर शासकीय गोदामाच्या जागेचा आगाऊ ताबा मेट्रोला मिळाला आहे. सदर जागा मेट्रोला सुपूर्द करण्याबद्दल अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने नुकताच अध्यादेश जारी केला असून आता ही २.६७ हेक्टरची जागा महामेट्रोच्या ताब्यात मिळेल, असे महामेट्रोच्या वतीने कळविण्यात आले आहे.महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रक्षित म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मेट्रो मार्गिकांच्या दरम्यान शिवाजीनगर हे मध्यवर्ती ठिकाण असून याच ठिकाणी शिवाजीनगर ते हिंजवडी ही मेट्रो लाईन देखील एकत्र येणार आहे. त्यामुळे हे ठिकाण पुणेकरांसाठी महत्त्वाचे असेल. याबरोबरच या जागेचा आगाऊ ताबा मिळाल्याने प्रकल्पाला आणखी वेग येईल.

You might also like
Comments
Loading...