fbpx

काल आईचं तर आज वडिलांचं निधन,परदेशी कुटुंबाची हृदयद्रावक कहाणी

पुणे – पुण्यातील जुना बाजार येथील शाहीर अमर शेख चौकातील एक मोठे होर्डिंग दुपारी दीडच्या सुमारास कोसळले असून यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहेत. या घटनेत रस्त्यावरील वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

होर्डिंग कटिंगचे काम सुरू असताना दुपारी 1 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास होर्डिंग तुटून खाली पडले. या होर्डिंगखाली सात जण सापडले. या मृतांमध्ये एक रिक्षाचालक आणि दुचाकीस्वाराचा समावेश आहे. हे होर्डिंग रेल्वे प्रशासनाच्या मालकीचे असल्याची माहिती समोर येत आहे.या अपघातात आणखी दोघांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी आहेत.  त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

याच  अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेल्या शिवाजी परदेशी यांच्या परिवाराची हृदयद्रावक कहाणी समोर आली आहे. परदेशी कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून नाना पेठ भागात राहते. दुर्दैवाने परदेशी यांच्या कुटुंबात गेल्या 48 तासांत झालेला हा दुसरा मृत्यू आहे. कालच शिवाजी यांच्या पत्नी प्रीती यांचे केईएम रुग्णालयात निधन झाले. त्यांचे अस्थी विसर्जन करण्यासाठी शिवाजी स्वतःच्या रिक्षात आई, आत्या, दोन मुलं आणि मित्रासह आळंदीला गेले होते. विसर्जन झाल्यावर दुःखी अंतःकरणाने ते पुण्याकडे परतत होते. मात्र रस्त्यात मंगळवार पेठेत रिक्षा चाललेली असतानाच होर्डिंग कोसळले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

परदेशी यांच्या पाठीमागे दोन अपत्य आहेत. मुलगी समृद्धी 17 वर्षांची तर मुलगा समर्थ अवघ्या 4 वर्षांचा आहे. ही दोघेही अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. . आई आणि वडील दोन दिवसात गमावलेल्या या मुलांसमोर घटनेने अक्षरशः आभाळ कोसळले आहे.

धुळे हत्याकांड : गृहराज्यमंत्र्यांनी फोडले सोशल मिडीयावर खापर

बिहारमध्ये गंगास्नानादरम्यान मोठी दुर्घटना ; चेंगराचेंगरीमध्ये तीन जणांचा मृत्यू

फलटण : विजेचा धक्का लागून २ वारकऱ्यांचा मृत्यू