fbpx

शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारीलाच- विनोद तावडे

विनोद तावडे

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख 19 फेब्रुवारी जाहीर झालेली असताना विधानसभेत आ. सुरेश हळवणकर ठाकुर यांनी परत हा विषय नव्याने मांडला. यावर सरकारची नेमकी भूमिका कळायला हवी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

त्यावर बोलताना सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी काही संघटना व पक्ष महाराजांची जयंती तिथीनुसार करतात. त्यामुळे सगळ्यांनी मिळून एकाच दिवशी महाराजांची जयंती साजरी करावी, अशी भूमिका भाजपा सदस्याने मांडली. सरकारची भूमिका म्हणाल तर गेली तीन वर्ष मुख्यमंत्री 19 फेब्रुवारीलाच महाराजांची जयंती साजरी करतात याकडे तावडे यांनी लक्ष वेधले.