शिवाजी महाराज-फादर ऑफ़ इंडियन नेव्ही; इतिहास मराठा आरमाराचा

shivaji maharaj father of indian navy marathi

विरेश आंधळकर: स्वराज्य म्हणजे काय, हे गोरगरीब मराठी, हिंदवी जनतेला दाखवलं ते म्हणजे शिवाजी महाराजांनी, ज्या वयात मुलं खेळण्यामधे गुंग असतात त्याच वयामधे 16 व्या वर्षी सह्याद्रि सारख विशाल ह्रदय आणि वाघाच बळ घेऊन  तोरणा ( पुरंदर ) किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्त्तमेढ रोवली, आणि तिथुनच सुरुवात झाली सुवर्णपर्वाची, भल्या मोठ्या-मोठ्या शत्रूंना पाणी मागायला लावणारी गनिमी काव्याची युद्ध नीती वापरून महाराजांनी आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक संकटानां आणि शत्रूंना कात्रजचा घाट दाखवत यश संपादन केलं . रायगड ही स्वराज्याची राजधानी. मराठा साम्राज्याचा विस्तार संपूर्ण हिंदुस्थानात वाढत होताआणि अशा  वेळेस सागरी किनारा आणि समुद्राच  महत्व शिवाजी महाराजांनी ओळखलं आणि उदय झाला भारतातील पहिल्या आरमाराचा (नेव्ही).

आपण जर भारताचा इतिहास पहिला तर शिवाजी महाराज्यांच्या आधी कोणीही समुद्र किनाऱ्याची सुरक्षा करण्यासाठी समुद्र सैनकांची तुकड़ी (नेव्ही ) निर्माण केली नाही, आणि म्हणूनच शिवाजी महाराजांना ‘फादर ऑफ़ इंडियन नेव्ही’ म्हणतात. कान्होजी आंग्रे हे मराठा आरमाराचे पाहिले सेना प्रमुख, आरमाराच्या प्रमुखाला दर्यासागर म्हणत. त्या काळी मराठा साम्राज्यामध्ये कल्याण आणि त्याच्या आसपासचा संपूर्ण भाग होता, तेथेच 1657 ते 58 साली जहाज बांधनीमधे कुशल कारागिरांकडून जहाजांची  निर्मिती पहिल्यादा सुरु झाली, सीद्दी, पोर्तुगीज, इंग्रज आणि डच यांच्यापासून स्वराज्याच रक्षण करण हे मराठा आरमाराच मुख्य काम, पण महाराजांची नजर होती अथांग समुद्र साम्राज्यावर,

Loading...

आरमाराच काम सुरु असतानाच पद्मदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, आणि आणखीन बऱ्याच छोट्या मोठ्या सागरी किल्यांची बांधनीही सुरु होती, अथांग समुद्र आणि त्याच्या किनारी असणार हिंदवी स्वराज्य, मराठा साम्राज्यातील व्यापाऱ्यांना समुद्रा मार्गे मुक्तपणे व्यापार करता यावा तसेच राज्याची भरभराट होण्यासाठी समुद्राचं  रक्षण अत्यंत गरजेच होतं, त्यामुळे संपूर्ण कोकणामधे असणाऱ्या असंख्य खाडया जहाजांसाठी उत्कृष्ठ आसरा होत तसेच  समुद्र किनारी आसनाऱ्या कठिन दगडाच्या जमीनी आरमाराच्या तळासाठी बलवान होत्या.

शिवाजी महाराज्यांच्या आरमाराची बलस्थाने
इतिहासकारांच्या मते आरमारामधे वेगवेगळ्या तुकड्या होत्या, प्रत्येक तुकड़ित 200 वेगवेगळ्या प्रकारची जहाज असायची. मराठ्यांनी स्वतःची जशी जमिनीवरची युद्धपद्धती ठरवली होती तशी आता समुद्रावरची युद्धपद्धती ते आखत होते. सुरवातीची पद्धत अतिशय सोपी होती. खोल समुद्रात संचार न करता जलदुर्गांच्या संरक्षणाखाली राहून, किनाऱ्या-किनाऱ्याने शत्रूला हुलकावणी देऊ शकणाऱ्या बोटी बनवण्याच काम सुरु करण्यात आल होत. ‘गुराबे’ आणि ‘गलबते’बनवायची तयारी जोमाने सुरु झाली होती. याबरोबरच तरांडे, तारू, शिबाड, मचवा, पगार, वाघोर, तिरकटी आणि पाल असे नौकांचे प्रकार आरमाराला देण्यात आलेल्या आज्ञापत्रात आढळतात. गुराब हे १५० ते ३०० टन इतकी वजन क्षमता असलेले मध्यभागी रुंद आणि टोकाला निमुळते होणारे असे जहाज होते. यावर २-३ डोलकाठ्या असतात. एकावेळी १५०-२०० सैनिक आणि खलाशी या प्रकाराच्या जहाजातून प्रवास करू शकतात. तर गलबत हे आकाराने अजून लहान . ७०-८० टन क्षमता असलेले हे जहाज फारतर १०० सैनिक वाहून नेत असे. मात्र जलद हालचालीच्या दृष्टीने हे अत्यंत उपयुक्त असे जहाज होते.

मराठ्यांची नवी जहाजे खाडीमधून खुल्या समुद्रात संचार करत होती. शत्रु समोर आल्यावर काय करावे कसे वागावे याचे स्पष्ट निर्देश आरमाराला दिले गेले होते. भर समुद्रात गनीम समोर आला तर एकत्र येऊन त्याच्याशी झुंजायचे, मात्र वाऱ्याची दिशा आपल्या विरुद्ध दिशेने असल्यास, गलबत योग्य चालवता येत नसल्यास शत्रूशी गाठ न घालता जवळच्या जलदुर्गाच्या आश्रयाला यावे. राजे म्हणतात तरांडीयास आणि लोकांस सर्वथा दगा होऊ देऊ नये. आपण राखून गनीम घ्यावा.; बरेचदा चकवा म्हणून शत्रू तहाचे निशाण दाखवतो आणि हरलो असे दाखवतो तेंव्हा लगेचच उडी घालून त्याच्या नजीक जाऊ नये, किंवा शत्रुला सुद्धा जवळ बोलावू नये, असे प्रशिक्षण आरमारास दिलेले होते. काही दगाफटका व्हायची शक्यता दिसल्यास कसलीही तमा न बाळगता तोफांच्या माराखाली तरांडे फोडून टाकावे असे स्पष्ट आदेश आरमाराला होते.

वर्षाचे ८ महिने आरमार खुल्या समुद्रात असले तरी पावसाळ्याचे ४ महिने मात्र ते योग्य ठिकाणी छावणी करून सुरक्षित करून ठेवावे लागे. याबाबत आज्ञापत्र सांगते की, ‘समुद्राला उधाण येण्याच्या १०-१५ दिवस आधीच आरमाराची छावणी योग्य ठिकाणी करण्याची आवश्यकता असते. खुल्या उथळ समुद्रात किंवा कुठल्याही जलदुर्गाच्या खाली ते उघड्यावर नांगरून ठेवता येत नाहीत. छावणी सुद्धा दरवर्षी वेगवेगळ्याकिल्ल्यांच्या सानिध्यात बंदरात करण्यात यावी म्हणजे दरवर्षी त्याच बंदराच्या आसपासच्या गावांना तोशीस पडत नाही. जिथे गनीम सहज सहजी पोचू शकत नाही अश्या ठिकाणी छावणी असावी’. आरमाराच्या सर्व अधिकाऱ्यांना स्पष्ट ताकीद होती की खाडी किनारी दिवस-रात्र गस्त घालून आरमार सुरक्षित राहील याची चाकरी करावी. खुद्द त्या भागाच्या सुभेदारांना २ महिन्याकरता संपूर्ण कुटुंब-कबिला घेऊन आरमाराची व्यवस्था बघण्याकरता आसपास जाऊन राहावे लागे इतके चोख आणि कडक नियम या बाबतीत महाराजांनी बनवले होते.

जस-जसे आरमार सजू लागले तशी त्याची व्यापारी धोरणे सुद्धा निश्चित केली गेली होती. सागरी व्यापारातून मिळणारे सर्व उत्पन्न सरकारी तिजोरीत जमा केले जाई. आरमारात काम करणाऱ्या प्रत्येकाला महिना पगार मिळायचा. कोणालाही सागरी उत्पन्नातून हिस्सा घेण्याची मुभा नव्हती. सर्व सुभ्यांना स्पष्ट ताकीद होती की विविध बंदरामध्ये येणाऱ्या जहाजांना कुठलीही तोशीश लावता कामा नये. त्यांना योग्य ती सुरक्षा देणे हे आरमाराचे काम होते. जर बंदरेच नाही राहिली तर व्यापार कुठून होणार आणि कुठून मिळणार जकात हे साधे तत्व होते. मिळणाऱ्या जकातीवर आणि अधिक व्यापारावर आरमार वाढवत जावे असे राजांचे धोरण होते. फक्त बंदरातच नाही तर दर्यामध्ये देखील उगाच कोणा व्यापारावर उपद्रव करू नये अशी स्पष्ट ताकीद सर्वांना होती. जर चुकून शत्रू पक्षाकडील व्यापाराचे जहाज कुठल्याही बंदरात आले तरी ते लुटू नये, सुभेदारांनी जाऊन त्याची परीक्षा करावी आणि योग्य ते समाधान करावे, त्यांना अधिकाधिक आपल्या कडील जिन्नस विकावे आणि योग्य जकात वसूल करावी असे शिवकालीन पत्रांमध्ये म्हटले आहे.

इंग्रज अधिकाऱ्यांच्या नोंदीनुसार 1665 मधे मराठा आरमारामधे 85 लढाऊ आणि 3 अतिशय उच्च दर्जाची जहाजं होती, तसेच नोव्हेबर 1670 मधे नविन 160 जहाजांची बांधनी कुलाबा जिल्ह्यातील नादगांव येथे करण्यात आली. तर आशी आहे शिवजी महाराजाच्या आरमाराची थोडीसी ओळख, जस प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या पानावर प्रस्तावना आसते त्याच प्रकारे ही महाराज्यांच्या युद्ध कलेची थोडीसी ओळख,

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार