जावयाला सोडून आ.शिवाजी कर्डिले सुजय विखेंसोबत !

अहमदनगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातुन भाजपाचे उमेदवार डॉ सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांनी विराट शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

या सगळ्यात विशेष महत्वाचे म्हणजे, राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचे सासरे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले हे ही यावेळी उपस्थित होते.त्यामुळे जावयाला सोडून आ.शिवाजी कर्डिले सुजय विखेंसोबत असल्याचे दिसून आल्याने सगळीकडे कर्डिले यांचीची चर्चा होती.

दिल्लीगेट येथून भव्य रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी सुजय विखे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली व पक्षाच्या विचारानुसार मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम आपण करायचे आहे.

या वेळी गीरीष महाजन, महादेव जानकर, राम शिंदे , दिलीप गांधी, विजयराव औटी, आ. शिवाजी कर्डीले, आ. मोनिकताई राजळे, आ. स्नेहलताताई कोल्हे, बबनराव पाचपुते , शिवसेनेचे जेष्ठ नेते व माजी मंत्री आनिल राठोड , भानुदास बेरड , शशिकांत गाडे, अभय आगरकर उपस्थित होते.