केडगाव शिवसैनिक हत्याकांड : विरोधकांचा मला संपविण्याचा डाव – आ. शिवाजी कर्डिले

महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे :- अहमदनगर मधील केडगाव येथे झालेल्या शिवसैनिक दुहेरी हत्याकांड व जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयावरील हल्ला याच्याशी माझा काहीही संबंध नसून मी यावेळी शहरात नव्हतोच माझा काहीही संबंध नसताना केवळ राजकीय भावनेने मला संपविण्यासाठी माझे नाव यात गोवून विरोधकांनी डाव रचून मला राजकारणातून बाजूला करण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले आहे.

ज्यावेळी न्यायालयात आरोपपत्र दाखल होईल त्यावेळी सगळे सत्य समोर येणारच आहे. तसेच विरोधकांनी रचलेला डाव कधीही यशस्वी होणार नसून मला विरोधक राजकारणातून कधीच संपवू शकत नाही असही कर्डिले यांनी म्हटलं आहे.अहमदनगर मधील नगर तालुक्यातील पिंपळगाव उजैनी येथील विविध विकास कामांचे भुमिपूजन आ. कर्डिले यांच्या हस्ते व माजी सभापती बाजीराव गवारे यांचे अध्यक्षतेखाली झाले. यावेळी आमदार शिवाजी कर्डिले बोलत होते.

सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पीय निधीअंतर्गत पिंपळगाव उज्जैनी ते कापुरवाडी रस्त्याची सुधारणा व डोंगरी विकास निधीअंतर्गत जवळपास २ कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बाजार समीती सभापती विलास शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग व भाजपा कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

You might also like
Comments
Loading...