संभाजी ब्रिगेडचा शिवव्याख्याते सचिन पाटील यांच्यावर हल्ला !

sachin patil

पातुर: विदर्भातील सिंदखेड राजा येथील शिवव्याख्याते सचिन पाटील यांच्यावर हल्ला करून त्यांना जबर मारहाण करण्यात आली आहे. ही घटना रविवारी घडली असून या मारहाणीत  सचिन पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनी पोलिसात फिर्याद दिली असता, फिर्यादीनुसार संभाजी ब्रिगेडचे पंकज जायले यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवव्याख्याते सचिन पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन अकोला जुने  शहरातील शिवमंगल कार्यालात करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन बाभळेश्वर सामजिक प्रतिष्ठान ने केले होते. सचिन पाटील व्याख्यानाचा कार्यक्रम संपवून घरी जात असताना, यावेळी वाडेगाव-पातुर रोडवरील बाभूळगाव फाठ्यानाजिक त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. तेथील शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी त्यांना जखमी अवस्थेत जवळील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.

संभाजी ब्रिगेडचे पंकज जायले यांच्यासह तिघांवर भादवि कलम ३२४, ३६६  नुसार गुन्हा दखल करण्यात आला आहे. व्याख्यानातील काही भाष्य चुकीचे वाटल्यामुळे हा हल्ला झाल्याचा समोर येतय. पुढील तपास पोलीस करत आहेत.