विदर्भाचा वाघ शिव ठाकरे ठरला बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता

टीम महाराष्ट्र देशा : अमरावतीचा शिव ठाकरे बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाच्या विजेतेपदाच्या ट्रॉफीवर शिव ठाकरेने आपले नाव कोरले आहे. अभिनेत्री नेहा शितोळे या स्पर्धेची उपविजेती ठरलीय आहे. टॉप 6 मध्ये शिव ठाकरेसोबत नेहा शितोळे, वीणा जगताप, शिवानी सुर्वे, किशोरी शहाणे, आरोह वेलणकर हे स्पर्धक होते.

याच प्रमाणे रविवारी झालेल्या बिग बॉस मराठी ग्रँड फिनालेमध्ये बिग बॉसच्या घरातील अनेक स्पर्धकांनी नृत्याविष्कार सादर केला. ‘रोडीज’ या रिअॅलिटी शोमधून त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे.

तसेच बिग बॉस च्या घरामध्ये सुरुवातीला 15 जणांनी प्रवेश केला होता. नंतर वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे अजून दोन जण घरात गेले. म्हणजेच दुसऱ्या पर्वाच्या जेतेपदासाठी 17 जणांमध्ये स्पर्धा होती.

महत्वाच्या बातम्या