‘शिवस्मारकाचा घाट हा निवडणुकीसाठीचा जुमला, विनायक मेटेंनी केलेली ही स्टंटबाजीच आहे’

टीम महाराष्ट्र देशा- शिवस्मारकाचा घाट हा निवडणुकीसाठीचा जुमला आहे, विनायक मेटेंनी केलेली ही स्टंटबाजीच आहे अशा शब्दांत मच्छीमार नेते दामोदर तांडेल यांनी संताप व्यक्त केला. विनायक मेटे यांनी शिवस्मारकाच्या पायाभरणी समारंभासाठी जाण्याचा घाट घालून अनेकांचा जीव धोक्यात घातला. त्यांच्यामुळेच सिद्धेश पवारला जीव गमवावा लागला, असा आरोप तांडेल यांनी केला आहे.शिवस्मारकाची जागाच चुकीची असून कुलाबा ते राजभवनपर्यंत समुद्रात खडकाळ जागा आहे. त्यामुळे या ठिकाणी भविष्यातही अशाच प्रकारच्या घटना घडत राहणार, असे ही तांडेल यांनी सांगितले.

दरम्यान,राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देखील याच मुद्द्यावरून सरकार आणि मेटे यांना लक्ष्य केलं आहे. अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाणाऱ्या बोटीला झालेला अपघात हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा बोट दुर्घटनेशी संबंध असल्याचा गंभीर आरोपही अशोक चव्हाणा यांनी केला आहे. विनायक मेटे यांच्या चौकशीच्या मागणीनंतर झालेला अपघात, घातपात तर नाही ना? असा संशय अशोक चव्हाण यांनी केला. या घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल लवकर प्राप्त होणे गरजेचे – मेटे

ज्यांना वडिलांचं स्मारक बांधता आलं नाही, ते राम मंदिर काय बांधणार?- अजित पवार

You might also like
Comments
Loading...