मनसेच्या संदिप देशपांडे यांना शिवसेनेच्या वरूण सरदेसाईंनी पाठवली मानहानीची नोटीस

blank

मुंबई : मनसे आणि शिवसेना यांच्यातील आणखी एक वाद समोर आला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना शिवसेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

५९ अॅप्सवर बंदी घातल्यानंतर चीनची पहिली प्रतिक्रिया

संदीप देशपांडे यांनी 26 जून रोजी पत्रकार परिषद घेऊन कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात आलेल्या मृतदेह बॅगमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. याशिवाय कोरोना संकंट काळात महापालिकेने खरेदी केलेले पीपीई किट, मास्क यामध्येदेखील घोटाळा झाल्याचा आरोप केला. यावेळी पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे यांनी वरुण सरदेसाई यांचं नाव घेतलं होतं. त्यानंतर वरुण सरदेसाई यांच्याकडून संदीप देशपांडे यांना मानहानीची नोटीस बजावण्यात आली.

… म्हणून कृषीमंत्री थेट त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार

यासोबतचं महापालिकेतील वेगवेगळी कंत्राट कशापद्दतीने शिवसेनेच्या लोकांना दिली जात आहेत. यामध्ये वरुण सरदेसाई यांचा समावेश ही असल्याचा आरोप संदीप देशपांडेंनी केला होता. हिच बाब अधोरेखित करत वरुण सरदेसाई यांच्याकडून संदीप देशपांडे यांना मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे.