शिवसेनेच्या ‘स्वाभिमानाची’ राज ठाकरेंनी उडवली खिल्ली

सत्ता सोडण्याच्या पोकळ धमक्यावर फटकारे

टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील सत्तेत असणारी शिवसेना मागील २ – ३ वर्षापासून कायम सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमक्या देत असते. मात्र भाजपची साथ काही सोडताना दिसत नाही. राजीनामा खिशात घेवून फिरतो म्हणणाऱ्या शिवसेना मंत्र्यांची सोशल मिडीयावर अनेकवेळा खिल्ली उडवली जाते. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीडीपीने एनडीएतून बाहेर पडण्याच्या घेतलेल्या धाडसी निर्णयाचे कौतुक केले आहे. तर दुसरीकडे मात्र शिवसेनेच्या ‘स्वभिमाना’ची खिल्ली उडवलीय.

राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर व्यंगचित्र पोस्ट करत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे हे सत्तेतून बाहेर पडणाऱ्या चंद्रबाबू नायडू यांना उद्देशून बोलत असल्याच दाखवण्यात आल आहे. उद्धव ठाकरे म्हणतात ‘ ह यात कसा आलाय मर्दपणा?. त्यांना म्हणाव हिम्मत असेल तर सरकारमध्ये राहून , अपमान गिळून वर सरकारला धमक्या देवून दाखवा’ राज ठाकरे यांचे हे कार्टून एकदम मार्मिक असून चंद्रबाबू नायडू यांचा ‘स्वाभिमान विरुद्ध उद्धव ठाकरे यांचा स्वाभिमान’ दाखवण्यात आला आहे.

RAJ THAKARE DRAWING

You might also like
Comments
Loading...