शिवसेनेकडून आगामी मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा; काँग्रेस-राष्ट्रवादीत संभ्रम

औरंगाबाद : शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेचा वर्धापन दिन काल मंगळवारी (८ जून) साजरा करण्यात आला. या निमित्त मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ऑनलाइन मार्गदर्शन करणार असे सांगण्यात आले होते. पण ऐनवेळी ते वेळ देऊ शकले नाही. पण त्यांच्याऐवजी राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले.

शिवसेना राजकारणात सातत्याने सर्व निवडणुकांमध्ये यश मिळवत आहे. यापुढे देखील जिल्हा परिषद, महानगर पालिका, पंचायत समित्या अशा सर्व प्रकारच्या निवडणुकीत देखील भगवाच फडकेल असा विश्वास सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

‘औरंगाबाद हे बाळासाहेबांचे आवडीचे शहर होते. त्यांनी मोठ्या विश्वासाने ते आपल्याकडे सोपवलेले आहे. त्यामुळे या शहराला पुढे नेणे आपले कर्तव्य आहे. १६८० कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच शहरवासियांसाठी मंजूर केली. रस्ते, कचऱ्याचा प्रश्न शिवसेनेने मार्गी लावला,’ असा दावा देसाई यांनी केला.

यापुढे देखील येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषदांसह सर्वच निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवाच फडकला पाहिजे,या दृष्टीने शिवसैनिकांने झोकून देत काम करावे, असे आवाहन देसाई यांनी केले. यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कारण, महाविकास आघाडी स्थापन करताना राज्यातील सर्व निवडणुका तीनही पक्ष ‘महाविकास’च्या झेंड्याखाली लढवल्या जातील असे ठरवण्यात आले होते. पंढरपूर विधानसभा ही त्यापैकीच एक भाग ठरली. पण आता आगामी महापालिका निवडणुका पाहता पालकमंत्री देसाई यांनी स्वबळाची घोषणा केल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महत्वाच्या बातम्या

IMP