भाजप सरकार विरोधातच शिवसेनेचा नांदगाव येथे मोर्चा !

टीम महाराष्ट्र देशा : येत्या गुरुवारी शिवसेना सत्तेत असून देखील भाजप सरकारच्या विरोधात दुष्काळात होरपळणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील नांदगावला मोर्चा काढणार आहे. त्यासंर्भात  शिवसेनेने जय्यत तयारी केली असून पदाधिकाऱ्यांंची टोळीच कामाला लावली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री  छगन भुजबळ यांच्या प्रभावक्षेत्रात हे शक्तीप्रदर्शन होणार असून ते किती यशस्वी होते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सध्या भारतीय जनता पक्षाचे गिरीश महाजन जिल्ह्याचे पालकमंत्री असून देखील नांदगाव येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे तसेच शेतीबाबत कोणत्याच उपाययोजना नाहीत. नांदगाव मतदार संघात नेहमीच दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने तेथील अनेक भीषण प्रश्नांवर शिवसेना राज्य सरकारच्या विरोधातच मोर्चा काढणार आहे.

या मोर्च्या बाबत न्यायडोंगरी येथील राममंदिरात बैठक झाली. त्यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.सदर मोर्चा तहसील कार्यालयावर जाणार असून मोर्च्यात सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या संख्येचा अंदाज सध्या पोलीस घेत आहेत. मोर्चा हा थेट राज्य सरकार विरोधातच असल्याने शिवसेनेच्या या भूमिकेला आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय संदर्भ जोडले जात आहेत.

You might also like
Comments
Loading...