टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना प्रचाराचे रणशिंग उत्तर महाराष्ट्रातून फुंकणार आहे. युती बाबत अनिश्चितता असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात 15 फेब्रुवारीला पहिली प्रचार सभा घेणार आहेत.गेले काही दिवस भाजप आणि शिवसेने मध्ये युतीबाबत धुसफूस सुरु आहे. त्यामुळे शिवसेना भाजप निवडणुकी आधी एकत्र येणार का असा प्रश्न असतानाच शिवसेनेने आता एकट्याचा मार्ग स्वीकारला आहे.
या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुखांनी सोमवारीच सर्व खासदारांची विभागवार बैठक घेतली होती. या बैठकीत संभाव्य उमेदवारांच्या नावाची चर्चा झाली होती. तसेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने ज्या मतदारसंघात निवडणूक लढवली नव्हती तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता.
दरम्यान सोमवारी बैठक पार पडल्यानंतर खा. संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना आम्ही राज्यात मोठे भाऊ असल्याचा दावा केला तर शिवसेना दिल्लीचं तख्त हलवेल असंही त्यांनी सांगितलं. तसेच भाजपकडून युतीचा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं होत.