शिवसेनेची वचनपूर्ती; दृष्टी गेलेल्या दिव्यांगांना मिळाली नवसंजीवनी!

शिवसेनेची वचनपूर्ती; दृष्टी गेलेल्या दिव्यांगांना मिळाली नवसंजीवनी!

shivsena

औरंगाबाद : शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा प्रियदर्शनी- इंदिरानगर व लायन्स क्लब मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमानाने बुधवारी (दि.२२) गरजू व आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या १५ रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.

सप्टेंबर रोजी शिवसेना शाखा प्रियदर्शनी नगर इंदिरानगर यांच्यावतीने मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबीर घेण्यात आले होते. यावेळी तब्बल ३५० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली होती. यापैकी बऱ्याच रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांची दृष्टी कमी झाली असल्या कारणाने डॉक्टरांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे सांगितले होते. शिवसेना उपशहरप्रमुख प्रमोद ठेंगडे व उपशाखाप्रमुख सुखराज हिवराळे यांनी पुढाकार घेऊन शिवसेना व लायन्स मीडटाऊन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने १५ रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.

याप्रसंगी शहरप्रमुख विजय वाघचौरे, युवासेना शहर चिटणीस धर्मराज दानवे, उपशहरप्रमुख संजय बारवाल आदींची प्रमुख उपस्थिती होती. हे शस्त्रक्रिया शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ. बायस, डॉ. अग्रवाल सर, डॉ. अनिल साळुंके, डॉ. पवार, शुभम दाभाडे, समता फाऊंडेशन, शिवानंद महालिंगे, नितीन सोनावणे, अण्णा दाभाडे यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रियदर्शनी नगर इंदिरानगर परिसरातील १५ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. गेलेली दृष्टी परत आल्यामुळे शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानून या उपक्रमाचे कौतुक केले.

महत्त्वाच्या बातम्या