‘शिवसेनेच्या दळिद्री पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याची सफरचंद चोरून खाल्ली, शिवाजी महाराज असते तर..’

nilesh rane

मुंबई: महाविकास आघाडी सरकारने लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ काल महाराष्ट्र बंद पुकारला होता. या बंदवरूनच भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर तसेच शिवसेनेवर निशाना साधला आहे.

रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये ही शिवाजी महाराजांची आज्ञा होती. पण आजच्या बंद दिवशी मालवणात शिवसेनेच्या दळिद्री पदाधिकाऱ्यांनी एका शेतकऱ्याची सफरचंद चोरून खालली. काहीतरी लाज राखा वाझेच्या औलादीनो, शिवाजी महाराज असते तर पाठीवर चाबकाचे कोरडे ओढले असते. अशा शब्दांत निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

 

सोबतच आज महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्ष्यांनी उरली सुरली इज्जत मातीत मिळवली. पवार साहेब आणि काँग्रेसच्या नादाला लागून शिवसेना फसली. सामान्य जनतेला आज खात्री झाली हे तिन्ही पक्ष फालतू आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा पोपट झाला, कॅमेरा घेऊन काही ठिकाणी दुकान बंद केली आणि सटकले.अशा शब्दांत त्यांनी महाराष्ट्र बंदचा निषेध केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या