शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निर्धार मेळावा

पेण: लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी कडून हल्लाबोल आंदोलन तर आता शिवसेनेकडून निर्धार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे रायगडवर भगवा फडकविण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे.

शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकविण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये निर्धार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. याची सुरवात शनिवार ७ एप्रिल रोजी पेण नगरपरिषदेच्या मैदानावर सायंकाळी ४ वाजता करण्यात येणार आहे.

हा मेळावा उद्योगमंत्री सुभाष देसाई , केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते तथा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.

You might also like
Comments
Loading...