मराठीला अभिजात दर्जा द्या! शिवसेना संसदेत आक्रमक

shivaena mp

नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरवात झाली असून शिवसेनेच्या खासदारांनी मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून आंदोलन केले.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून मागणी होत असतांना. त्या मागणीचे राजकरण होत आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देता येणार नाही, अशी भूमिका भाजपकडून मांडण्यात आली आहे. शिवसेनेच्या काही खासदारांनी यापूर्वी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती.

‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देता येणार नाही. जर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला तर अन्य ३० भाषांनाही तो दर्जा द्यावा लागेल. त्यामुळे हे शक्य नसल्याचं राजनाथ सिंग यांनी सांगितल्याचे शिवसेनेचा खासदारांनी सांगितले होते. त्यामुळे शिवसेनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.