fbpx

‘त्या’ दुर्दैवी घटनेतील नातेवाईकांना शिवसेनेचा मदतीचा हात

टीम महाराष्ट्र देशा : पुण्यातील कोंढवा भागात शनिवारी अल्कॉन सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना पहाटे २ वाजताच्या सुमारास कोंढव्यातील तालाब कंपनी समोर घडली. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेनेने मृतांच्या नातेवाईकांना मदतीचा हात दिला.

शिवसेनेचे नेते ना.प्रा.आ.तानाजी सावंत ( जलसंधारण मंत्री ) महाराष्ट्र राज्य व जयंतराव सावंत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव सावंत यांनी मयताच्या नातेवाईकाला प्रत्येकी १ लाख रू.मदत जाहीर केली. या वेळी बोलताना आ.सावंत यांनी शिवसेनेनं ८० टक्के समाजकारण व २०टक्के राजकारण करावं हीच स्व.बाळासाहेबांची शिकवण आहे तोच आदर्श घेऊन आम्ही जबाबदारी स्वीकारली असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.