मला मंत्रीपद मिळू नये म्हणून शिवसेनेचे प्रयत्न- नारायण राणे

आता शिवसेना संपत चालली असल्याचे केले वक्तव्य

सावंतवाडी: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी मला मंत्रीपद दिले जाऊ नये म्हणून शिवसेना प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट केले. तसेच आता शिवसेना संपत चालली असल्याचे वक्तव्य केले. ते सुंदरवाडी महोत्सवाच्या सांगता समारंभात बोलत होते.

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर स्वाभिमानी पक्षाची स्थापना करत नारायण राणेंनी एनडीएमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंना मंत्रीपदाच गाजर दाखवून यशस्वी राजकीय खेळी खेळली. मात्र नारायण राणे यांना मंत्रिपद मिळणार या आशेची निराशा झाल्याचे चिन्ह दिसत आहेत. राणेंनी आता मंत्रिपद मिळत नाही म्हणून शिवसेनेवर आरोप केले आहेत.

सुंदरवाडी महोत्सवाच्या सांगता समारंभात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी खासदार नीलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत, सौ. नीलम राणे, आयोजक संजू परब, दत्ता सामंत, सभापती रवींद्र मडगांवकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.