शिवसेनेचा दसरा मेळावा होणार षण्मुखानंद सभागृहात, संजय राऊतांची माहिती

sanjay raut

मुंबई: यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने होणार नसल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्याप्रमाणे यंदाचा दसरा मेळावा माटुंगा येथील षण्मुखानंद हॉलमध्ये होणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा 100 टक्के होणार, असं संजय राऊत यांनी सांगितलं होतं. दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर होत असतो. मात्र कोरोना संकटामुळे यंदा हा मेळावा शिवाजी पार्कऐवजी माटुंगा येथील षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे. षण्मुखानंद हॉलमध्ये त्याच जोरात हा मेळावा होईल. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील आणि देशाच्या राजकारणाला दिशा देण्याचा प्रयत्न करतील असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार नाही. नियम आणि संकेतांचं पालन करुन दसरा मेळावा आयोजित करण्याची तयारी सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची देखील तीच इच्छा असल्याचेही राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या