पालघरमधील पराभव शिवसेनेच्या जिव्हारी; थोड्याच वेळात मातोश्रीवर बैठक

मुंबई: भाजपा खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये भाजपचे राजेंद्र गावित विजयी झाले आहेत. गावित यांनी शिवसेनेचे उमेदवार तथा चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांचा ४४,५८९ मतांनी पराभव केला आहे.

दरम्यान, पालघरमध्ये पराभव झाल्यानंतर शिवसेनेची मातोश्रीवर विचारमंथन बैठक बोलावण्यात आली आहे.  तर दुसरीकडे संजय राऊत यांनी पराभवाचे खापर ईव्हीएम मशीन आणि मतदान प्रक्रियेतील घोळावर फोडले आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुक शिवसेना आणि भाजपने प्रतिष्ठेची बनवली होती. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी प्रचारात एकमेकांची चिरफाड केल्याचं पहायला मिळाल. मतमोजणीमध्ये सुरुवातीपासून भाजपचे राजेंद्र गावित यांनी आघाडी घेतली होती. तर शिवसेनेचे चिंतामण वणगा यांना लीड तोडण्यात अपयश आले आहे.