fbpx

‘स्वबळा’ची फक्त घोषणाच ! विधानपरिषद निवडणूकीसाठी शिवसेनेची भाजपशी युती

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेची स्वबळावर लढण्याची डरकाळी अखेर पोकळ ठरली. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र स्वबळावर लढण्याची फक्त घोषणाच होती कारण विधानपरिषद निवडणूकीसाठी शिवसेनेनेची भाजपशी युती पक्की झाली आहे. ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ या स्वरुपाची शिवसेनेची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.

भाजपची सत्ता आली तेव्हापासून सत्ता सोडण्याची धमकी देणारी त्यानंतर स्वबळावर लढणार म्हणून घोषणा करणाऱ्या शिवसेनेने आपल्या जुन्या मित्रासोबत नात जोपासलं आहे. याच महिन्यात होणारी विधानपरिषद निवडणूक भाजपा आणि शिवसेना एकत्र लढवणार असून त्यांच्यात ५०-५० फॉर्म्युला निश्चित झाला आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी झालेल्या भाजप-शिवसेना युती मुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे. आता २०१९ विधानसभा निवडणुकींमध्ये भाजप-सेना युती होईल का ? म्हणून जोरदार चर्चा सुरु आहे. विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन, भाजपचे दोन आणि काँग्रेसचा एक सदस्य विधानपरिषदेतून मे आणि जून अखेर निवृत्त होत असल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने ही निवडणूक जाहीर केली.

कोण लढणार कुठली जागा ?

विधानपरिषद निवडणुकीसाठी तीन जागांवर शिवसेनेनं उमेदवारांची घोषणा केली असून तीन जागा भाजपा लढवणार आहे. नाशिक, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि परभणी-हिंगोलीतून शिवसेनेनं उमेदवार दिलेत. तर अमरावतीतून भाजपाच्या प्रवीण पोटेंनी पुन्हा अर्ज दाखल केलाय, तर दोन जाागांवरील उमेदवार आज निश्चित होतील. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे.