Share

Shivsena । “आधी पक्ष फोडला आता घर फोडण्याचं काम सुरु”; शिवसेनेचा शिंदे गटावर घणाघाती आरोप

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. बीकेसी येथे सुरू असलेल्या दसरा मेळाव्याला जयदेव ठाकरे उपस्थित दाखवली. यावेळी ते शिंदे गटात असल्याचेही त्यांनी सांगितले. निहार ठाकरेंनंतर आता जयदेव ठाकरेंनी शिंदे गटाची वाट धरली, त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. हे सगळं बरखास्त करा, निवडणुका घ्या आणि शिंदे राज्य येऊ द्या, असं भावनिक आवाहन जयदेव ठाकरेंनी यावेळी केलं. यावरून आता माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.

काय म्हणाले चंद्रकांत खैरे?

जयदेव ठाकरे यांना मंचावर आणून घर फोडण्याचं नीच काम शिंदे गटाने केले आहे असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर पुन्हा एकदा घणाघात केला आहे. आधी पक्ष फोडला आता घर फोडण्याचं काम सुरू आहे. उध्दव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात सर्व काही जिंकले असेही खैरे म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या भाषणात लोक उठून जात होते. पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप देखील खैरी यांनी केला आहे.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे शिंदे गटामध्ये दाखल झाले आहेत. बीकेसीवर सुरु असलेल्या दसरा मेळाव्याला जयदेव ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी आपण शिंदे गटात असल्याचेही त्यांनी सांगितले. निहार ठाकरे यांच्यानंतर जयदेव ठाकरे यांनीही शिंदे गटाची वाट धरल्यामुळे हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातोय. एकनाथ शिंदे यांनी पक्षाबरोबरच ठाकरे कुटुंबातील सदस्य देखील फोडले आहेत. तसेच शिंदेंना याचा राजकिय फायदा होईल का ? हे येणाऱ्या कळताच समजेल.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now