शिवसेना- युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

पुणे – शिवसेना- युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांच्या उपस्थितीत या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

पश्चिम महाराष्ट्र साहित्य कला व सांस्कृतिक विभाग अध्यक्ष सनी मानकर यांच्या वतीने झालेला कार्यक्रम बारामती हॉस्टेल, पुणे येथे शनिवारी सकाळी झाला.

दुर्गेश शेडगे, संकेत शेडगे, पुष्कर बोडके, शुभम माने, अनिल नाईक, शुभम मते, सुजीत कदम या पुणे शहर शिवसेना- युवासेना पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्षाला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

या प्रवेश सत्रामुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे. निवडणुकीच्या पार्शवभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांचा हा प्रयोग बंडखोरीला प्रोत्साहन देणारा ठरण्याची शक्यता निर्माण करू शकतो, हे या पक्ष प्रवेशातून स्पष्ट दिसते.

यावेळी स्वप्निल खवले, शुभम मातेले, आकाश म्होकर, श्रीकांत बालघरे, सनी पवार, सचिन भोसले, अनिकेत म्होकर, रोहित पळसकर, अक्षय मांडेकर, ओमकार ठोंबरे व रोहन रासकर उपस्थित होते.