शिवसेना जनतेसाठी काम करते, नागरिकांनी साथ द्यावी – अंबादास दानवे

औरंगाबाद : सुपर संभाजीनगर संकल्पना घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कोविड काळातही दर्जेदार, उच्च प्रतीचे विकासात्मक कामे आपण वेगाने करत शहराचा कायापालट करणार असल्याचे प्रतिपादन विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी केले.

औरंगाबाद ला जागतिक स्तरावरील उच्च दर्जाचे मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून जीवनमान उंचावण्याचे आमचे ध्येय आहे. हिंदुत्वाचा विचार पुढे  घेऊन जात असतानाच विकासात्मक दृष्टिकोनातून शहराची सुपर संभाजीनगरकडे घोडदौड सुरू केली आहे. शिवसेना जनतेसाठी काम करते, नागरिकांनीही शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन देखील आमदार दानवे यांनी केले. मयूरनगर प्रभागातील गजानननगर येथील निलेश जोशी यांचे घर ते  एन ११ येथील भाजी मंडई पर्यंतच्या सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास  दानवे यांच्या हस्ते आज केले.

आमदार अंबादास दानवे यांच्या विशेष प्रयत्नाने नगरविकास खात्यामार्फत महानगरपालिका  क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी या योजनेअंतर्गत २५ लक्ष रुपये खर्चून हा रस्ता तयार करण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे  येथील नागरिकांना  ये – जा करण्यासाठी वाहतुकीला त्रास  सहन करावा लागत होता. बऱ्याच दिवसापासून मयूर नगर, सुदर्शन नगर या भागातील नागरिकांची हा रस्ता लवकर व्हावा, यासाठी मागणी केली होती. आमदार दानवे यांच्या विशेष प्रयत्नाने या रस्त्याच्या कामाची सुरुवात झाल्याने नागरिकांनी आमदार दानवे यांचा सत्कार केला.

महत्वाच्या बातम्या :