Video-रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या कार्यालयात घुसून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली तोडफोड

पुणे: पुण्यातील जांभुळवाडी येथील रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या कार्यालयात घुसून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तोडफोड केली आहे.

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ च्या अपूर्ण कामामुळे होणाऱ्या अपघाताच्या निषेधार्त ही तोडफोड करण्यात आली आहे. शिवसेनेच्या भोर तालुका माजी उपसभापती अमोल पांगारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी रिलायन्स इन्फ्राच्या पुणे ऑफिसमध्ये तोडफोड केली.

रिलायन्स इन्फ्रा कंपनी आणि नेशनल हायवे औथोरिटी ही एकमेकांनकडे चाल ढकल करत असल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ च रखडले काम पूर्ण होऊ शकलं नाही. त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे असं शिवसेनेच्या पदाधिकारी अमोल पागारे यांनी म्हटले आहे.

पहा व्हिडीओ…

IMP