fbpx

नॉट रिचेबवाला नाही तर रांगडा ऊमेदवार द्या, मातोश्रीवर उस्मानाबादच्या शिवसैनिकांची मागणी

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. यावेळी विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांच्या उमेदवारीला काही स्थानिक नेत्यांकडून विरोध करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गायकवाड नको तर शंकरराव बोरकरांना उमेदवारी द्यावी, असा सूरही यावेळी उमटला आहे.

युतीमध्ये शिवसेनेकडे असणारा खात्रीशीर लोकसभा मतदारसंघ म्हणून उस्मानाबादकडे पाहिले जाते.  २००९ चा अपवाद वगळता 1996 पासून या  मतदारसंघात शिवसेनेला विजय मिळाला आहे. २०१४ मध्ये रवींद्र गायकवाड यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला होता. मात्र मागील साडेचार वर्षात गायकवाड यांनी मतदारसंघात विशेष कामगिरी केली नसल्याची तक्रार स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत आहे.

शिवसेनेची ताकद असणाऱ्या शिवसैनिकांना खा रविंद गायकवाड यांनी डावलल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेनेकडून इच्छुक असणारे शंकरराव बोरकर यांना उमेदवारी देण्याची जोरदार मागणी शिवसैनिकांनी केली आहे. मागील पाच वर्षे नॉट रिचेबल राहणारा नाही, तर रांगडा शिवसैनिक ऊमेदवार देण्याची मागणी मातोश्री दरबारी करण्यात आली आहे.

2 Comments

Click here to post a comment