शिवसेनेला सत्तेला लाथ कशी मारायची हे गाढव शिकवेल- धनंजय मुंडे

धनंजय मुंडेंचा हल्लाबोल यात्रेदरम्यान शिवसेनेवर जोरदार हल्ला

जळगाव: विरोधी पक्षने धनंजय मुंडे यांनी हल्लाबोल यात्रेदरम्यान शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. मुंडे म्हणाले, मी शिवसेनेकडे एक गाढव घेऊन जाणार आहे. ते शिवसेनेला सत्तेला लात मारण्याचे शिकविल. सरकारमधून नेहमी बाहेर पडण्याची धमकी देणाऱ्या शिवसेनेवर धनंजय मुंडेनी टीका केली. जळगाव येथे आयोजित हल्लाबोल यात्रेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. धनंजय मुंडे म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी जशी गाय घेऊन जाणार आहे, तसे शिवसेनेकडे एक गाढव घेऊन जाणार आहे. हे दाखवायला की गाढव कशी लाथ मारतो. म्हणजे सेना सत्तेला लाथ कशी मारावी लागते हे शिकेल.’ तसेच आमच्या भाषणाचे वाक्य पूर्ण होण्याआधीच दुसरं वाक्य लोकं बोलत आहेत. इतका प्रचंड विरोध याआधी आम्ही पाहिला नव्हता. भाजप, मोदी आणि त्यांची आश्वासनं आता चौकाचौकात चेष्टेचा विषय बनला आहेत. हल्लाबोल यात्रेदरम्यान विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनादरम्यान धनंजय मुंडेनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा तोफ टाकली. देशभरात सुरू असणाऱ्या पीएनबी बँक घोटाळ्यावरून मुंडे म्हणाले‘पंतप्रधान मोदी म्हणाले होते, मी पंतप्रधान नाही तर या देशाचा चौकीदार आहे. मग मल्ल्या, मोदी हजारो कोटी रूपये घेऊन पळाले तेव्हा चौकीदार काय करत होते?’ असे मुंडे म्हणाले.

bagdure

You might also like
Comments
Loading...