…तर शिवसेना भाजपसोबत युती करणार ?

uadhav thakare

टीम महाराष्ट्र देशा: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यात दोन तास चर्चा झाली. मात्र या दोघांमध्ये काय दाळ शिजली हे अजून गुलदस्त्यात आहे. चर्चेत २०१४ च्या निवडणुकीमध्ये ज्या कारणामुळे युती तुटली होती. ते कारण समोर आलं असल्याची राजकीय चर्चा आहे. त्यामुळे भाजपने १५१ जागा दिल्या तर शिवसेना युती करणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे

आदित्य ठाकरे यांनी २०१४’च्या विधानसभा निवडणुकीत १५१ जागा लढवण्याचे स्पष्ट केले होते. मात्र भाजपने १४७ जागांचा प्रस्ताव शिवसेनेसमोर ठेवला होता. शिवसेनेने तो प्रस्ताव नाकारला. तेव्हा शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम होती. त्यानंतर शिवसेनेने भाजपसोबतची गेल्या २५ वर्षातील युती तोडली. यासोबतच यापुढे कधीही कुणासमोर कटोरा घेऊन जाणार नाही, अशीही घोषणा केली. इतकेच नाहीतर “गेली २५ वर्ष शिवसेना युतीत सडली. पण आता ही फरफट होणार नाही. तुम्ही मला वचन देत असाल तर आज मी निर्णय घेतो आहे की, आता यापुढे शिवसेना महाराष्ट्रात भगवा फडकवेल. कोणाच्याही समोर युतीसाठी कटोरं घेऊन जाणार नाही. महाराष्ट्रात कुठेही यापुढे मी युती करणार नाही.” अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती.

आता आगामी निवडणुकांच्या युतीसाठी हेच कारण समोर येणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने शिवसेनेची मनधरणी करण्याचे अनेक प्रयत्न केले. केंद्रीय मंत्र्यापासून ते राज्य मंत्रिमंडळातील नेत्यांनी शिवसेनेने सोबत युती करण्याचे प्रयत्न केले.  शिवसेना आता काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.







Loading…




Loading...