शिवसेनेकडून ‘हे’ असणार मुख्यमंत्री पदाचे दावेदार, तर राष्ट्रवादीने केले ‘या’ ज्येष्ठ नेत्याचे नावं पुढे

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात महाशिवआघाडी कडून सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शिवसेना , राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षांनी बहुमतसिद्ध करण्यासाठी तयारी दाखवली आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शिवसेनेला पाठींबा देणार आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पद भूषवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादी कडून कोण मुख्यमंत्री पदी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हे पुढे असल्याने. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेतूनच तीन तर राष्ट्रवादीकडून एका नेत्याचं नाव चर्चेत आहेत. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे , खुद्द पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव चर्चेत आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अजित पवार यांचे नाव सुचवले जाण्याचे शक्यता आहे.

शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांचे नाव तरुण मुख्यमंत्री म्हणून पुढे येत असले तरी विधी मंडळाच्या कामकाजाचा अनुभव कमी असल्याने आदित्य याचे नाव पिछाडीवर पडण्याची शक्यता आहे. तर त्यांच्या ऐवजी एकनाथ शिंदे अथवा खुद्द उद्धव ठाकरे यांचे नाव अग्रभागी असेल, असे राजकीय तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव चर्चेत आहे. अजित पवारांना राज्याच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असल्याने त्यांना शेवटच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री पद भूषवण्याची संधी मिळणार असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या