शिवसेना २०१९ च्या निवडणुकीत राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करणार -गिते

राज्यात शिवसेनेला वातावरण पोषक असल्याचा अनंत गीते यांना विश्वास

टीम महाराष्ट्र देशा- राज्यात शिवसेनेला वातावरण पोषक असून सन २०१९ च्या निवडणुकीत राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा आमचा निर्धार असल्याचे वक्तव्य केंद्रिय अवजड उद्योग मंत्री ना. अनंत गिते यांनी शनिवारी महाड येथे पत्रकारांशी बोलताना केले.

 शिवसेना दिलेल्या वचनाप्रमाणे विकासात कमी पडणार नाही. खासदार म्हणून आपण आपल्या मतदार संघात अनेक विकास कामे केली आहे. पंतप्रधान सडक योजनेतून अनेक रस्त्याची कामे मार्गी लावली आहेत. खासदार निधीचा शंभर टक्के विनियोग आपण केलेला आहे. त्यामुळे शिवसेनेबद्दल केवळ आपल्याच मतदार सघात नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असल्याचा विश्वास गीते यांनी व्यक्त केला.