video- शिवसेना देशातील सर्व राज्यात निवडणुका लढवणार ; उद्धव ठाकरे

मुंबई : नुसती ५६ इंचाची छाती असून उपयोग नाही. त्या ५६ इंचाच्या छातीत शौर्यच नसेल तर काय उपयोग असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले. तसेच नौदलात जे शौर्य आहे, ते तुमच्या ५६ इंच छातीत नाही असेही ते म्हणाले. सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी येथे झालेल्या बैठकीत आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी बढती करण्यात आली. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

जम्मू-काश्मीरमध्ये भाजप ज्या पक्षाच्या मांडीला मांडी लावून सत्तेवर बसला आहे त्या पक्षाचे (पीडीपीचे) आमदार दहशतवाद्यांचा उल्लेख ‘आमचे भाऊ’ म्हणून करतात. त्यावर भाजप काही बोलत नाही, असेही ते म्हणालेत. मोदींनी अहमदाबादमध्ये जम्मू- काश्मीरमध्ये रोड शो केला असता आणि लाल चौकात तिरंगा फडकावला असता तर मी स्वतः मोदींचे कौतुक केले असते. तसेच शिवसेना देशातील सर्व राज्यात निवडणुका लढवणार आहे. असे स्पष्ट केले.

अशी आहे शिवसेनेचे नवी कार्यकारिणी
नेतेपद- आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे, आनंदराव आडसूळ, अनंत गीते
सचिवपद- मिलिंद नार्वेकर
प्रवक्ते- अरविंद सावंत, नीलम गोऱहे, मनिषा कायंदे, अमोल कोल्हे, अनिल परब