कर्नाटकात शिवसेना विधानसभेच्या ५० ते ५५ जागा लढवणार

शिवसेनेने कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार असल्याचे केले स्पष्ट

मुंबई: कर्नाटकात शिवसेना ५० ते ५५ जागा लढवणार आहे. शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. सेनेने फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना गोवा आणि उत्तर प्रदेश पाठोपाठ कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी सीमा भागात प्रचाराला जाऊ नये. हे नैतिकदृष्ट्या योग्य नाही. राज्यपालाच्या अभिभाषाणात सीमा भागाचा उल्लेख असतो, हे त्यांना शोभणारं नाही, असंही राऊत म्हणाले. आगामी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढेलच, पण यापुढे सर्वच राज्यात शिवसेना उमेदवार देईल. आम्ही निवडणूक जिंकू किंवा हरु, किती मतं पडतील माहित नाही, पण आम्ही लढू असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी भाजप शिवसेना एकत्र असल्याचे विधान केले होते. त्यामुळे भाजप शिवसेनेसोबत युती टिकून राहावी म्हणून प्रयत्न करीत आहे.

You might also like
Comments
Loading...