मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांची महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेच्या सहाव्या जागी निवडून येण्यासाठी जोरदार प्रयत्न दिसत आहेत. शिवसेनेकडून संभाजीराजेंना पाठिंबा देण्याची तयारी दाखवली, मात्र त्यासाठी एक अट ठेवली आहे. शिवसेनेत प्रवेश केल्याशिवाय राज्यसभेची उमेदवारी मिळणार नाही, असे शिवसेनेने जाहीर केले आहे. संभाजीराजेंनी मात्र ही ऑफर नाकारली आहे. मात्र शिवसेनाही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी शिवसेनेचे दोन उमेदवार देणार आणि ते दोन्हीही निवडून आणणार असे ठणकावून सांगितले.
संजय राऊत म्हणाले, “दोन जागा शिवसेना लढवणारच. आम्ही दोन्ही जागी उमेदवार देऊ आणि ते निवडून ही आणू. संभाजीराजेंनी अपक्ष लढण्याची निर्णय घेतला आहे. “राज्यसभेच्या जागेसाठी जेव्हा एखादा उमेदवार असं सांगतो, तेव्हा त्यांच्याकडे निवडून येणाऱ्या मतांची व्यवस्था त्यांनी केलेली असते. ज्याअर्थी त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे, त्याअर्थी त्यांना कोणीतरी पाठिंबा देतं असणार. अशावेळी आम्ही मध्ये पडणं योग्य नाही”.
महत्वाच्या बातम्या –