मुंबई: महाराष्ट्रातील शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यासह ६ जणांचा कार्यकाळ संपला असून आता महाराष्ट्रातील 6 जागांसह देशातील ५७ जागांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यावरूनच सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये चांगलीच चढाओढ दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवरच संजय राऊत यांनी ट्वीट करत विरोधकांना इशारा दिला आहे.
“राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागली आहे. भ्रष्टाचारातून पैसा, त्यातून घोडेबाजार! हे दुष्ट चक्र कधी थांबेल? सहावी जागा शिवसेना लढेल. कोणी कितीही आकडे मोड करावी, आकडे आणि मोड दोन्ही महविकास आघाडीकडे आहे. लढेंगे…जितेंगे!”, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.
राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी
महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागलीय.. भ्रष्टाचारातून पैसा .. त्यातून घोडेबाजार!हे दुष्ट चक्र कधी थांबेल?
सहावी जागा शिवसेना लढेल.
कोणी कितीही आकडे मोड करावी.. आकडे आणि मोड दोन्ही महविकास आघाडीकडे आहे. लढेंगे . जितेंगे. pic.twitter.com/VOXRKRDzdk— Sanjay Raut (@rautsanjay61) May 18, 2022
दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत, भाजपचे राज्यसभा खासदार पियूष गोयल, विकास महात्मे, विनय सहस्त्रबुद्धे, राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे पी.चिदंबरम यांच्या ६ जागांसह राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ५७ जागांसाठीचा द्वीवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून १० जूनला निवडणूक होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 MI vs SRH : हैदराबाद झिंदाबाद..! चित्तथरारक लढतीत मुंबईचा पराभव; टिम डेव्हिडची स्फोटक खेळी व्यर्थ!
- IPL 2022 MI vs SRH : हैदराबादचं मुंबईला १९४ धावांचं आव्हान; त्रिपाठी, गर्गची सुंदर खेळी!
- “राजमुद्रेची विटंबना थांबवा,” ; संभाजी ब्रिगेडचं मनसेला आवाहन
- “महिला कुडमुडी ज्योतिषी…”; चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर टीका
- “शरद पवारांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशत माजवला जातोय” ; माधव भंडारी