तर शिवसेनेचा ‘मनसे’ होईल : संजय काकडे

sanjay-kakde

पुणे : शिवसेना स्वबळावर लढली तर शिवसेनेचा मनसे होईल असे वक्तव्य भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केले आहे. सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी येथे झालेल्या बैठकीत आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी बढती करण्यात आली. त्यावेळी यंदा लोकसभा व विधानसभा स्वबळावर लढण्याचे शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. शिवसेना देशातील सर्व राज्यात निवडणूक लढवणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

संजय काकडे म्हणाले, शिवसेना स्वबळावर लढली तर शिवसेनेचा मनसे होईल. शिवसेनेला त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा पस्तावा होईल तसेच शिवसेनेचा एकही खासदार निवडून येऊ शकणार नाही. शिवसेनेसोबत विधानसभेला युवती होईल अस वाटत नव्हत. आता शिवसेनेनेच जाहीर केल आहे. त्यामुळे शिवसेनेच्या निर्णयाचं स्वागत आहे. भाजपचे २०१९ ला २८ खासदार व १६५ आमदार निवडून येतील असे भाकीत संजय काकडे यांनी केले आहे. शिवसेना जर या निर्णयावर ठाम राहिली तर शिवसेनेचे ५ खासदार निवडून येण कठीण आहे. असेही काकडे म्हणाले.