आगामी निवडणूकीत शिवसेना आमच्याबरोबर राहील – पंकजा मुंडे

pankaja munde

पुणे: आगामी निवडणुकांत युती होण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. भाजप शिवसेनेन एकत्र लढावं हे सर्व भाजप नेत्यांना वाटते, त्यामुळे आगामी निवडणुकांत शिवसेना आमच्या बरोबरच राहील असा विश्वास ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. मोदी सरकारला सत्तेत येऊन ४ वर्ष पूर्ण  झाली. या निमित्ताने पुण्यात पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

एका बाजूला पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात शिवसेना व भाजप नेते एकमेकांचे वाभाडे काढत आहेत, आजवर कधी न पाहिलेला शिवसेना- भाजपमधील सत्ता संघर्ष पालघरमध्ये पहायला मिळत आहे. असं असताना देखील पंकजा मुंडे या सेनेला चुचकरण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.

मोदी सरकारच्या ४ वर्षपूर्ती निमित्त आज भाजपकडून ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आले आहे, पंकजा मुंडे यांनी देखील पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत ४ वर्षाच्या कामगिरीचा पाढा वाचून दाखवला

Loading...

पंकजा मुंडे म्हणाल्या की,  ‘मोदी सरकारला आज ४ वर्ष पूर्ण झाली आहेत, आजच्या दिवशीच ऐतिहासिक विजय मिळवत मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. स्वच्छ भारत मशीनमुळे महिलांना आरोग्याची हमी मिळाली आहे. गरिबांना बँकिंग व्यवस्थेत आणण्याचे काम जनधन योजनेद्वारे करण्यात आले. केवळ १२ रुपयांत विमा योजना सुरू करण्यात आली, डीबीटीमुळे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. पहिल्यांदा ५० टक्के नुकसान झाल्यावरच पीकविमा दिला जात होता, आज ३४ टक्के नुकसान झाले तरी लाभ मिळतो आहे.