भाऊ-बहिणीच्या लढतीत उतरणार शिवसेना

परळी विधानसभा मतदार संघात होणार तिरंगी लढत

बीड: निवडणुका राज्यात सर्वत्र होत असतात मात्र ज्या निवडणुकीकडे अवघ्या राज्याच लक्ष लागून असत ती परळी विधानसभा निवडणूक. परळी विधानसभेची निवडणूक यावेळी शिवसेनाही लढणार आहे. शिवसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसंपर्क मोहीम राबवण्यात येत आहे. यावेळी शिवसैनिकांसमोर बोलताना ”निवडणूक लढवण्याचा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ‘मातोश्री’वरुन हाच संदेश घेऊन मी आलो आहे,” अशी घोषणा शिवसेनेचे देगलूरचे आमदार सुभाष साबणे यांनी केली.

शिवसेनेच्या या घोषणेनंतर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे विरुद्ध विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे ही लढत परळी विधानसभा मतदार संघात तिरंगी होणार, असे चिन्ह उमटत आहेत. परळी विधानसभा निवडणूक लढवण्याचा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. मातोश्रीवरुन हाच संदेश घेऊन मी आलो असल्याची घोषणा शिवसेना आमदार सुभाष साबणे यांनी केली. परळी हा महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर मागील निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार उभा केला नव्हता. धनंजय मुंडे याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावरुन भाजपमधून बाहेर पडले होते. तेव्हापासूनच या मतदारसंघात भाऊ-बहिणीत मोठी लढत पाहायला मिळते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर गेल्या निवडणुकीत शिवसेनेने परळी मतदारसंघातून उमेदवार उभा केला नव्हता.

दरम्यान, कुणी परळी मतदारसंघातून निवडणूक लढवत असेल तर त्यांचं स्वागत असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. कोण निवडणूक लढवेल माहीत नाही. जे काही असेल निवडणूक लढवावी लागेल, त्याशिवाय जिंकण्यात मजा नाही. मी मागच्या दाराने आलेले नाही, जनतेतून निवडून आले आहे,” असेही मुंडे म्हणाल्या.

You might also like
Comments
Loading...