‘मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला चारीमुंड्या चीत करणार’ ; आशिष शेलारांचा दावा

uddhav thackrey

मुंबई : फेब्रुवारी 2022 मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. म्हणजेच निवडणुकीला जवळपास 9 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. पण निवडणुकीच्या आधीपासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. : महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. महापालिका निवडणुका वेळेवर जाहीर करण्याचं धारिष्ट्य शिवसेनेने दाखवावं. आम्ही त्यांना चारीमुंड्या चीत केल्याशिवाय राहणार नाही, असा दावा आशिष शेलार यांनी केला आहे.

आशिष शेलार यांनी ठाण्यातील पत्रकारांशी संवाद साधताना हा दावा केला. महापालिका निवडणुका वेळेवर जाहीर करण्याचे धारिष्ट्य शिवसेनेने दाखवावे. मुदती आधीच निवडणूक घ्यावी किंवा मुदत संपल्यानंतर निवडणूक पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. याचाच अर्थ शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कोविड काळ बघून वेळेवर निवडणुका घेण्यात यावी, अशी आमची शिवसेना आणि निवडणूक आयोगाला विनंती आहे. वेळेवर निवडणूक झाली तर शिवसेनेला चारीमुंड्या चीत करण्याची भाजपची तयारी आहे, असं शेलार यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, शिवसेनेचा कोरोनाचे कारण सांगत मुंबई महानगरपालिका निवडणूक दोन वर्ष पुढे ढकलण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप यापूर्वी आशिष शेलार यांनी केला होता. महापालिकेच्या निवडणुका दोन वर्षासाठी पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव आहे. शिवसेनेचा हा डाव आम्ही हाणून पाडू, असा इशारा आशिष शेलार यांनी होता.

महत्वाच्या बातम्या

IMP